
Gemini for Education जाणून घ्या
Outline
आशयाचा परिचय
Gemini ओव्हर व्ह्यू
Gemini Google चा सर्वात अष्टपैलू AI सहाय्यक आहे. हे एक 'मल्टीमॉडल' व्यासपीठ आहे, जिथे तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ ऑर व्हॉइस माध्यमातून संवाद साधू शकता.
Geminiकडे तुमचा एक सहाय्यक म्हणून पहा; त्याची खरी ताकद म्हणजे वर्गाचे नियोजन आणि तयारी यांसारखी कष्टाची कामे तो अत्यंत वेगाने पूर्ण करतो, जसे की:
'स्कॅफोल्डिंग' (शिकण्याच्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने आधार देणे) मध्ये मदत: हे एखाद्या मोठ्या धडा काही सेकंदातच साध्या आणि टप्प्याटप्प्याने समजणाऱ्या मार्गदर्शकामध्ये रूपांतर करू शकते.
सर्व प्रकारच्या शिकण्याच्या पातळीनुसार मदत: तुम्ही एखादा मोठा आणि कठीण परिच्छेद घेऊन Gemini ला त्याची भाषा अधिक सोपी करण्यास सांगू शकता.
झटपट रंजक उदाहरणे तयार करणे: कठीण विषय विद्यार्थ्यांना आधीच आवडणाऱ्या गोष्टींशी जोडण्यासाठी, हे रोजच्या जीवनातील उदाहरणे किंवा समर्पक दाखले (analogies) चुटकीसरशी तयार करू शकते.
अध्यापन आणि व्यावसायिक कामे अधिक प्रभावी करण्यासाठी Gemini एक 'सह-रचनाकार' (co-designer) म्हणून काम करते. चला, त्याची काही वैशिष्ट्ये पाहूया."
Gemini पुरेपूर वापर करणे
Gemini नैसर्गिक मानवी भाषा समजण्यासाठी तयार करण्यात आले असले तरी, केवळ एका वाक्याच्या साध्या विनंतीऐवजी अधिक तपशीलवार प्रॉम्प्ट दिल्यास तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतील. स्पष्ट आणि प्रभावी सूचना तयार करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही 'PARTS' फ्रेमवर्क चा वापर करून प्रॉम्प्ट्स तयार करतो:
Persona: तुम्ही कोण आहात किंवा AI ने कोणती भूमिका बजावावी, हे निश्चित करा.
Aim (उद्देश): तुमचे उद्दिष्ट स्पष्टपणे मांडा—तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे?
Recipients: तुमचा वाचकवर्ग किंवा श्रोते कोण आहेत हे स्पष्ट करा (उदा. महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी किंवा प्राथमिक शाळेतील वर्ग).
Theme: अपेक्षित शैली किंवा सूर (tone) वर्णन करा, जसे की 'अनालिटिकल आणि फॉर्मल' किंवा 'विनोदी आणि रंजक'.
Structure (रचना): तुम्हाला अपेक्षित असलेले फॉरमॅट नमूद करा, जसे की बुलेट पॉइंट्सची यादी, रुब्रिक (मूल्यमापन तक्ता) किंवा ३० सेकंदांची पटकथा (script).
सुरक्षित आणि जबाबदार वापर
जरी या क्षमता परिवर्तनकारी असल्या तरी, त्यांना तुमच्या व्यावसायिक देखरेखीची आवश्यकता आहे. कारण AI पुढील 'सर्वात संभाव्य' स्टेपचा अंदाज लावते, त्यामुळे त्यात मानवी पूर्वग्रह दिसू शकतात किंवा ते तथ्यांची 'कल्पना' देखील करू शकते. Google च्या AI तत्त्वांनुसार मानवी सहभागाची आवश्यकता आहे: AI पहिला मसुदा तयार करते, परंतु अंतिम निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करता.
उपयुक्त AI साधने आणि तंत्रज्ञान तयार करून ज्ञानवृद्धी करणे, गुंतागुंतीची आव्हाने सोडवणे आणि लोकांना प्रगती करण्यास मदत करणे यासाठी Google कसे वचनबद्ध आहे, याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ai.google या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
डेमो
आपण 'ग्रीनहाऊस इफेक्ट' हा एक सामान्य विषय घेऊया आणि K-12 (शालेय शिक्षण) तसेच उच्च शिक्षणासाठी 'Gemini' कशा प्रकारे पाठांची रचना करते, ते पाहूया.
प्रॅक्टिस
आता तुमची पाळी. चला, तुमच्या अभ्यासक्रमातील त्या एका कठीण विषयावर किंवा संकल्पनेवर 'Gemini'चा (Gemini) वापर करूया – अशी संकल्पना जिथे तुमचे विद्यार्थी अनेकदा अडखळतात किंवा ज्यामध्ये त्यांची रुची कमी होते.
तुमचे कार्य:
ॲक्सेस (Access): gemini.google.com उघडा.
रीफ्रेम प्रॉम्प्ट: Gemini ला ती कठीण संकल्पना घेऊन ती "तीन वेगवेगळ्या पद्धतींनी स्पष्ट करण्यास सांगा: एक गोष्ट म्हणून, टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया म्हणून आणि विज्युअल रेप्रेसेंटेशन."
'स्कॅफोल्ड' प्रॉम्प्ट: Gemini ला सांगा, "या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतील अशी काही 'वाक्य-सुरुवात' (sentence starters) तयार कर" किंवा "या विषयावरील १,००० शब्दांच्या निबंधासाठी एक पद्धतशीर 'मूल्यमापन निकष-सूची' (rubric) तयार कर."
सुधारणा (Refine): Geminiशी संवाद साधा. असे करून पहा: "ही पद्धत जरा जास्तच फॉर्मल वाटते. ती माझ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक कॉन्व्हर्सेशन आणि रंजक बनव.
रिफ्लेक्शन
या सेशनत आपण पाहिले की, Gemini हे केवळ एक चॅटबॉट नाही, तर उच्च-गुणवत्तेच्या मार्गदर्शनासाठीचे एक प्रभावी साधन आहे.
आता तुमच्या अध्यापन-अनुभवावर जरा विचार करूया:
वर्गातील तुमच्या अनुभवाचा विचार करता, Gemini चा वापर करून विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि पाठ्यपुस्तकातील अमूर्त सिद्धांत व त्यांचे रोज जीवन यांमधील दुवा साधण्यास कशी मदत होऊ शकेल?"
